Skip to content

आमच्याविषयी

नमस्कार….वंदे मातरम् !

स्वदेशी ही फक्त नीती नाही, तर जीवनशैली आहे – मा. राजीव भाई.

आमच्या विद्या पियुष स्वदेशी पीठम, या सामाजिक संस्थेद्वारे राजीव दीक्षित यांच्या स्वदेशी विचारांनी प्रेरित होऊन आणि “फक्त स्वदेशी नीतीमुळेच हिंदुस्थान पुन्हा सुवर्ण भूमी बनू शकतो” या विश्वासाने कार्यआहोत. त्यासाठी आम्ही हे स्वदेशी भारत स्वावलंबी भारत अभियान सुरु केले आहे.आमचा उद्देश “स्वदेशी भारत, स्वावलंबी भारत” म्हणजे देशाला बलवान, आत्मनिर्भर, आर्थिकदृष्ट्या संपन्न, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त बनवणे हा आहे. स्वदेशी चळवळ ही फक्त एक संकल्पना नाही, तर ती प्रत्येक भारतीयाच्या जीवनात बदल घडवणारी शक्ती आहे. आमचा मंच तुम्हाला या चळवळीत सहभागी होण्यासाठी आणि स्वतःला स्वदेशी मूल्यांनी समृद्ध करणाऱ्या व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी प्रेरित करतो.✊

आम्ही या मंचाद्वारे खालील गोष्टींवर यापुढे काम करणार आहोत.

  • गोसेवा: देशी गायींच्या संरक्षणाला प्राधान्य देऊन कृषी व पंचगव्य-आधारित उत्पादनांचा प्रसार.
  • भाव: राष्ट्रीय अभिमान आणि स्वदेशी संस्कृतीची जागरूकता.
  • भाषा: मातृभाषा व संस्कृत यासारख्या भारतीय भाषांचा आणि गुरुकुल शिक्षणाचा प्रचार.
  • भूषा: स्वदेशी वेशभूषा, खादी आणि हातमागासारख्या स्वदेशी वस्त्रांना प्रोत्साहन.
  • भेषज: म्हणजे औषधे, आयुर्वेद आणि हर्बल उपचारांचे पुनरुज्जीवन.
  • भोजन: सेंद्रिय आणि परंपरागत भारतीय अन्नपदार्थांचा प्रसार.
  • भजन: पारंपारिक भारतीय वाद्ये व भक्ती संगीत आणि मनाची शक्ती व आध्यात्मिक जागृती.
  • भवन: स्वदेशी विचारांचे सांस्कृतिक केंद्र आणि मंच स्थापन.
  • स्वदेशी शिक्षण: वैदिक गणित आणि प्राचीन शिक्षणपद्धतींचा प्रसार.
  • योग: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि वैदिक ज्ञान.
  • आयुर्वेद: नैसर्गिक चिकित्सा आणि जीवनशैली सुधारणा.

🤚 आम्ही विश्वास ठेवतो की स्वदेशी ही फक्त एक नीती नाही, तर जीवनशैली आहे. परदेशी शोषणाला नकार देऊन, आपल्या मातीशी जोडलेल्या मूल्यांना जागवणे हा आमचा संकल्प आहे. या प्रवासात आपण सर्वांनी मिळून भारताला पुन्हा सुवर्ण युगाकडे नेण्याचा प्रयत्न करूया.

🍀 आपण आमच्या चळवळीत सहभागी होऊ शकता.

☘️ स्वदेशी उत्पादने वापरा, आयुर्वेदिक जीवनशैली स्वीकारा, आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा. एकत्र येऊन, आपण बदल घडवू शकतो!

.🌻